वोडाफोनने लॉन्च केला त्यांचा सगळ्यात स्वस्त प्लान

vodafon
मुंबई : आपला सगळ्यात स्वस्त प्रिपेड प्लान वोडाफोनने लॉन्च केला आहे. ८४ दिवसांची व्हॅलिडिटी असलेल्या या प्लानची किंमत २९७ रुपये असून ग्राहकांना या प्लानमध्ये दिवसाला २५० मिनिटांचे आणि आठवड्याला १ हजार मिनिटांचे फ्री कॉलिंग मिळणार आहे. याचबरोबर ४जीबी ३जी/४जी डेटा मिळणार आहे. वोडाफोनने हा प्लान काही ठराविक सर्कलमध्येच लॉन्च केला आहे. मुंबई, कर्नाटक आणि इतर सर्कलमध्ये वोडाफोनचा हा प्लान मिळणार आहे.

काही दिवसांपूर्वीच वोडाफोन आणि आयडियाचे विलीनीकरण झाले होते. दोन्ही कंपन्यांचे यानंतर ग्राहक ४०८ मिलियन एवढे झाले आहेत. विलीनीकरणानंतर वोडाफोनकडे नव्या कंपनीची ४५.१ टक्के हिस्सेदारी आहे. आदित्य बिर्ला ग्रुपकडे २६ टक्के आणि आयडिया शेअरधारकांकडे २८.९ टक्के हिस्सेदारी आहे. या दोन्ही कंपन्यांवर १.१५ लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे.

वोडाफोन-आयडियाच्या विलीनीकरणानंतर ग्राहकांना नवीन सीम कार्ड घ्यायची गरज नाही. आपल्या सिस्टिममध्येच जुन्या ग्राहकांचा डेटा कंपनीने अपडेट केला आहे. तसेच जुन्या नंबर आणि सिम कार्डवरच नवीन ऑफर्स सुरु केल्या आहेत.

Leave a Comment