फ्लिपकार्टवरुन खरेदी करा मोबाईल आणि बजाज अलायन्स जनरलकडून मिळवा ‘हा’ विमा

flipkart
बंगळुरू- अनेकांना ऑनलाईन मोबाईल खरेदी करुन चोरी गेल्यास अथवा स्क्रीन फुटल्याने त्रासाला सामोरे जावे लागते. फ्लिपकार्टने आता ग्राहकांची ही चिंता दूर करण्यासाठी मोबाईल खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आजपासून विम्याची सुविधा दिली आहे. बजाज अलायन्स जनरलकडून मोबाईलची स्क्रीन फुटल्यास किंवा चोरी झाल्यास हा विमा मिळणार आहे.

माहितीनुसार एकूण मोबाईलपैकी ३६ टक्के मोबाईल हे स्मार्टफोन असून या मोबाईलची स्क्रीन फुटणे अथवा मोबाईल चोरीला जाण्याची भीती असते. मोबाईल कंपनीकडून याबाबतीत ग्राहकांना कोणताही विमा मिळत नाही. याबाबत माहिती देताना बजाज अलायन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी तपन सिंगेल यांनी सांगितले की, ग्राहकांना केवळ ९९ रुपयात मोबाईल विमा मिळणार आहे. यामध्ये मोबाईलच्या सुरक्षेचा पूर्ण प्लॅन आहे. हा विमा वर्षभरासाठी असणार आहे. ग्राहकांना विम्याचा दावा करताना मोबाईल परत करणे अथवा निश्चित करण्यात आलेली रक्कम घेणे हा पर्याय असणार आहे. विम्याची रक्कम ग्राहकाच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. ग्राहकांना हा विमा आजपासून खरेदी करण्यात येणाऱ्या मोबाईलवर मिळणार आहे. बजाज अलायन्सची फ्लिपकार्ट ही कॉर्पोरेट एजंट आहे. फ्लिपकार्टचे वॉलमार्टने १६ बिलियन डॉलरचे मुल्य असलेले ७७ टक्के शेअर १८ ऑगस्टला खरेदी केले आहेत.

Leave a Comment