तब्बल ८.०९ कोटी रूपयांना विकली गेली व्हिस्कीची ‘ही’ बाटली

whisky
व्होली ग्रेलची व्हिस्की बाटली जगातील सर्वात महागडी ठरली असून व्हिस्कीच्या या बाटलीला तब्बल ८.०९ कोटी रूपयांची बोली लागली आहे. या बाटलीची जोरदार चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. एवढ्या महागड्या किंमतीमध्ये विकल्या गेलेल्या बाटलीमध्ये काय आहे ? याची लोकांना उत्सुकता लागली आहे. १९२६ च्या मॅकलन वॅलेरियो अदामीची व्होली ग्रेलची व्हिस्की बाटली आहे.

या व्हिस्कीच्या फार लहान एडिशनचे लेबल डिझाइन वालरियो अदामी आणि पीटर ब्लेक नावाच्या दोन पॉप आर्टिस्टने केले होते. ज्यात २४ बॉटल्स होत्या. ब्लेकने यातील १२ बॉटल्स डिझाइन केल्या होत्या. तर अदामीने १२ बॉटल्स डिझाइन केल्या होत्या. याबाबत माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार, तब्बल ६० वर्षे जुनी व्हिस्कीची ही बाटली आहे. १९२६ ते १९८६ दरम्यान या व्हिस्कीची निर्मिती करण्यात येत होती. व्हिस्कीचे तज्ज्ञ मार्टिन ग्रीन सांगतात की, या व्हिस्कीला मिळालेल्या किंमतीने मी खूश आहे. ही फार गर्वाची बाब आहे की, व्हिस्कीच्या दुनियेत स्कॉटलॅडने एक नवीन विक्रम कायम केला आहे.

Leave a Comment