या अॅक्ट्रेसवर सरकारची Too Sexy असल्यामुळे बंदी

kambodia
जगभरात सर्वसाधारपणे महिलेच्या सौंदर्यामुळे त्यांची कामे सहजपणे होऊन जातात. परंतु, सौंदर्यसुद्धा त्यांच्यासाठी अडचणीचे ठरत असल्याचे हे पहिलेच प्रकरण म्हणावे लागेल. असेच काही कंबोडियन अॅक्ट्रेससोबत झाले असल्यामुळे पूर्ण जगात आता तिचीच चर्चा सुरू आहे. डॅनी क्वान असे या २४ वर्षीय कंबोडियन अभिनेत्रीचे नाव आहे. कंबोडियाच्या सरकारने या अॅक्ट्रेसवर एक वर्षाची बंदी घातली आहे. सरकारच्या मते, गरजेपेक्षा क्वान या जास्त सुंदर असल्यामुळे त्यांच्यावर बंदी घातली आहे.

याबाबत संस्कृती आणि कला मंत्रालय, कंबोडियाचे म्हणणे आहे की, डॅनीचे फोटोज आचारसंहितेचे उल्लंघन करतात. यामुळे त्यांच्याविरुद्ध कडक पावले उचलावी लागत आहेत. तुमच्या माहितीसाठी, डॅनी क्वॉनचे फेसबुक पेजवर लाखोंच्या संख्येने फॉलोअर्स आहेत. स्वत:वर बॅन लागल्याचे समजताच ही अॅक्ट्रेस म्हणाली की, मी असे काहीही केलेले नाही, ज्यामुळे मला बॅन केले जावे. देशातील इतर महिला कलाकारांचे उदाहरण देत तिने सांगितले की, सर्व अॅक्ट्रेसेस अशा आहेत, ज्या शूटिंगदरम्यान उद्दिपीत करणाऱ्या पोज देतात. पडद्यावर जाहीर विवस्त्र होऊन किस करतात. त्यांच्यावर का नाही लावली बंदी? क्वान पुढे म्हणाली की, आता मी सरकारच्या निर्णयानंतर असा कोणताही फोटो सोशल मीडियावर शेअर करणार नाही, ज्यात मी सेक्सी दिसेल. ती म्हणाली की, सेक्सी दिसू नये हे माझ्यासाठी खूप कठीण आहे, कारण मला नैसर्गिक सौंदर्य लाभलेले आहे.

Leave a Comment