जागतिक हास्यदिन, लोकप्रिय स्माईलीची अशी आहे कुळकथा

smylie
ऑक्टोबर महिन्यातला पहिला शुक्रवार हा जागतिक हास्य दिन म्हणून साजरा करण्याची प्रथा १९९९ पासून सुरु झाली. त्यामुळे आजचा ५ ऑक्टोबरचा शुक्रवार हा जागतिक हास्यदिन म्हणून साजरा केला जात आहे. आज डिजिटल युगात चेहऱ्यावर हास्याचे प्रतिक म्हणजे प्रत्येकाच्या नजरेसमोर सर्वप्रथम येथे ती स्माईलीची इमोजी. या स्माईलीची कुळकथा फारच मनोरंजक आहे.

आज सोशल मिडिया व्यापून राहिलेली ही स्माईली जन्माला आली ती १९६३ साली. त्याचे असे झाले कि अमेरिकेतील एका विमा कंपनीचे दुसऱ्या कंपनीत विलीनीकरण झाल्याने विमा कंपनीचे कर्मचारी नाराज झाले. त्यांची नाराजी दूर करून त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू यावे आणि त्यांचा उत्साह वाढवा यासाठी या विमा कंपनीने जाहिरात कंपनी चालविणाऱ्या हार्वी रस बॉल याच्याशी संपर्क साधून काही करता येथे का पहा असे सांगितले तेव्हा हार्वीने पिवळ्या रंगाचा एक हसरा चेहरा रेखाटला. तीच पहिली स्माईली, हा चेहरा विमा कंपनीच्या कामगारांना खूपच आवडला आणि लवकरच तो जगप्रसिद्ध झाला. हि स्माईली रेखाटण्यासाठी हार्वीने ४५ डॉलर्स म्हणजे आत्ताचे ३१०० रुपये चार्ज केले होते.

emojy
स्माईली लोकप्रिय झाल्यावर त्याच्या बटणांची विक्री जोरदार सुरु झाली आणि १९७१ मध्ये अशी ५ कोटी बटणे विकली गेली. युएस पोस्टल विभागाने १९९९ मध्ये स्माईली फेस स्टँप जारी केला. १९ सप्टेंबर १९८२ मध्ये कानार्गी मिलान विद्यापीठातील प्रो. स्कॉट फालमन यांनी प्रथम इलेक्ट्रोनिक संदेश स्वरुपात काही चिन्हांचा वापर केला आणि त्यानंतर स्माईलीच्या शेकडो इमोजी तयार झाल्या.

नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात असे दिसून आले आहे कि, ऑनलाईन दुनियेत १९ ते २५ वयोगटातील युवा ६५ टक्के या प्रमाणात स्माईलीचा वापर करतात तर ५० पेक्षा अधिक वयाच्या लोकांत हाच वापर ४८ टक्के आहे.

Leave a Comment