बँक दरोड्यातील आरोपी चक्क राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळात

NCP
पंढरपूर : चक्क बँक ऑफ महाराष्ट्रच्या ७८ लाख रुपयाच्या दरोड्यातील आरोपी रामेश्वर मासाळ याला मंगळवेढा तालुक्यातील राष्ट्रवादी मजबुत करण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात सामील केल्याने पक्ष नेमका कसा मजबुत करायचाय असा प्रश्न नागरीक विचारु लागले आहेत.

१ नोव्हेंबर २०१७ ला पंढरपूर सांगोला रस्त्यावर खर्डी गावाजवळ सांगोला येथील बँक ऑफ महाराष्ट्रची पैसे घेवून जाणारी व्हॅन लुटण्यात आल्याने एकच खळबळ उडाली होती. हा बनाव बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापक अमोल भोसले यांनी रचला होता. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष रामेश्वर मासाळ याचे नाव या तपासात पुढे आले होते.

हा आरोपी सध्या जामिनावर बाहेर असताना मंगळवेढा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी थेट शरद पवार यांच्या भेटीला जाताना असा दरोड्यातील आरोपी नेलाच कसा असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे.

Leave a Comment