आजपासून देशभरात लागू झाले सात नवीन नियम

narendra-modi
मुंबई: देशभरात आजपासून सात नवीन नियम लागू झाले आहेत. तुमच्या आमच्यावर या नियमांचा थेट परिणाम होणार आहे. छोट्या बचत ठेवींवर आजपासून जास्त व्याज मिळेल. तर कॉल ड्रॉप झाल्यास मोबाईल कंपन्यांना दंड द्यावा लागणार आहे. शिवाय गॅस दरात वाढ झाली आहे.

छोट्या बचत ठेवींवर आर्थिक वर्षाची तिसरी तिमाही अर्थात ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान जास्त व्याज मिळणार आहे. मुदत ठेव, रिकरिंग, ज्येष्ठ नागरिकांची बचत ठेव, मासिक उत्पन्न खाते, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, पल्बिक प्रोव्हिडेंट फंड, किसान विकास पत्र आणि सुकन्या समृद्धी स्कीमवर पहिल्यापेक्षा ०.४० टक्केपर्यंत जास्त व्याज मिळणार आहे.

Leave a Comment