प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणारे गुगल आज झाले २० वर्षांचे

google
जाएंट सर्च इंजिन असलेल्या गुगलचा आज २० वा वाढदिवस आहे. गूगलने या निमित्ताने एक खास डूडल तयार केले आहे. गूगलने आपला पहिला वाढदिवस १९९८ साली साजरा केला होता. पण तरीही तारखेवरुन वाद कायम होता. त्यानंतर १७व्या वाढदिवसापासून २७ सप्टेंबरलाच गूगल अधिकृतपणे आपला वाढदिवस साजरा करु लागला. त्यानुसार गूगलचा आज २०वा वाढदिवस आहे. गूगल ४ सप्टेंबर १९९८ रोजी पहिल्यांदा जगासमोर आले. गूगलची स्थापना लॅरी पेज आणि सर्जी ब्रेन यांच्या हस्ते झाली आणि आज तर इंटरनेट जायंट सर्च इंजिन म्हणून गूगलकडे पाहिले जाते.

कंपनीने १९९७ साली डोमेन रजिस्टर केले आणि अधिकृतपणे ‘गूगल’ असे नाव ठेवण्यात आले. गूगलने २००२ साली पहिल्यांदा डूडल तयार केले. गूगल आपल्या होमपेजवर जगप्रसिद्ध व्यक्तींची जयंती-पुण्यतिथी, महत्त्वाचे कार्यक्रम, महत्त्वाचे वर्धापनदिन इत्यादींसाठी डूडल प्रसिद्ध करते. जगभरात प्रसिद्ध असलेले गूगल सर्च इंजिन आहे. येथे अगदी सोप्या पद्धतीने प्रत्येक विषयांवरील माहिती, संदर्भ उपलब्ध होतात. सुरुवातीला फक्त दुसऱ्या वेबसाईट्सचे डिटेल्स पुरवल्या जातील, अशी गुगलची कार्यप्रणाली होती. पण या विचारात बदल करुन या कंपनीने असा प्लॅटफॉर्म बनवला जिथे जगभरातील माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होईल आणि त्यावरूनच ‘एका क्लिकवर सर्व काही’ या संकल्पनेची सुरूवात झाली.

मराठी, हिंदीसह नऊ भारतीय भाषांत भारतात Google.co.in ही सेवा उपलब्ध आहे. मागील २० वर्षांत गुगलने यशाची उत्तुंग झेप घेतली आहे. गुगलने आपल्यात माहितीचे सारे युग सामावून घेतले असून जगापुढे माहितीचे भांडार खुले करून दिले आहे.

Leave a Comment