२७ हजार ५०० रूपयांनी स्वस्त होणार गुगलचा पिक्सल २ एक्सएल!

google1
गुगलने आपल्या पिक्सल २ एक्सएलच्या किंमतीमध्ये मोठी कपात केली आहे. आता पिक्सेल २ एक्सएल (६४जीबी) चा फोन भारतामध्ये ४५, ४९९ रूपयांना मिळणार आहे. या फोनची किंमत गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ७३, ००० रूपये होती.

याबाबत माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार कंपनीने गुगल पिक्सल २ एक्सएलफोनच्या किंमतीमध्ये ४० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. गुगल पिक्सल २ एक्सएलची किंमत २७,५०१ रूपयांनी घटली आहे. पण याची अधिकृत घोषणा कंपनीने केली नाही. पण याची घोषणा ९ ऑक्टोबर रोजी पिक्सल ३च्या लाँच इव्हेंटवेळी होण्याची शक्यता आहे.

काही वर्षापूर्वी मोबाईल मार्केटमध्ये गुगलने एन्ट्री केली आणि अनेक बड्या कंपन्यांना टक्कर देत टेलिकॉम क्षेत्रात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. गुगलने अॅपल कंपनीला टक्कर देण्यासाठी दोन फोन लाँच केले होते. पिक्सेल २ एक्सएल या फोनमध्ये ६ इंचाची एचडी स्क्रीन आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८३६ प्रोसेसर आहे. याबरोबरच ६४ जीबी आणि १२८ जीबी स्टोरेज असे दोन पर्याय उपलब्ध आहेत. या दोन्हीची रॅम ४ जीबी आहे. पिक्सेल २ एक्सएल मध्ये १२ मेगापिक्सेल सिंगल रिअर कॅमेरा आणि १२ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. रिअर कॅमेऱ्यात फेस डिटेक्शन आणि ऑटो लेझर फोकस हे विशेष फीचर्स आहेत.

Leave a Comment