टोमणे बहाद्दर पतीला जाड्या पत्नीचे ‘बॉडी बिल्डर’ होऊन उत्तर

ruby
आज करोडो महिलांसाठी तमिळनाडूच्या चेन्नईमध्ये राहणारी रुबी ही महिला प्रेरणा बनत आहे. लग्नानंतर एक मूल असताना ती बॉडीबिल्डर झाली एवढेच आपल्याला माहित आहे. पण तिची त्यापलिकडची कहाणी ऐकून तुम्हाला तिचा नक्कीच अभिमान वाटेल.

महिलांचे वजन मूल झाल्यावर वाढते, त्याचप्रमाणे रुबीचेही वजन खूप वाढले होते. तिचे हे वजन एवढे वाढले की तिचा पती आणि कुटुंबातील सर्व लोक तिला तिच्या वजनावरुन टोमणे मारायचे. एखादी स्त्री अशाप्रकारे टोमणे मारल्यावर खचून जाईल. पण रुबीने ही गोष्ट सकारात्मक घेतली आणि त्यावर मात करत तिने पुढे जाण्याचे ठरवले. रुबीने आपल्या जुन्या रुपात पुन्हा येण्यासाठी घाम गाळण्यास सुरुवात केली आणि आपण तिला आज बॉडी बिल्डर म्हणून ओळखतो.

याबाबत अधिक माहिती देताना रुबी सांगते, आपल्या पतीचा माझ्यातील रस माझ्या वाढत्या वजनामुळे कमी होत चालला होता. मग आपल्यालाच आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल या विचाराने मी चालायला सुरुवात केली. माझे वजन त्यामुळे बरेच आटोक्यात आले. मूल झाल्यानंतर व्यायामासाठी घराबाहेर पडणे काहीसे कठिण व्हायचे पण माझे ध्येय मी निश्चित करुन त्या दिशेने प्रयत्न करत राहीले. मी त्या काळात वजन कमी होण्यासाठी काहीही करण्यास तयार होते. रुबी म्हणते, खूप पैसा बॉडी बिल्डींग करण्यासाठी लागतो. आहार आणि वेगवेगळ्या सप्लिमेंटससाठी पैशाची आवश्यकता असल्याचे ती सांगते. रुबीला सहा वर्षांचा एक मुलगा असून ती नियमित बॉडी बिल्डींगचा सराव करते.

Leave a Comment