येथील चिमुकले चक्क मगरींवर बसून खेळतात घोडा-घोडा

crocodile
तुम्ही जो फोटो पाहत आहात त्यावर तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही. पण आम्ही आज तुम्हाला जगातील अशा एका देशाबाबत सांगणार आहोत. जिथे माणसे चक्क हिंस्र प्राण्यांसोबत राहतात. पश्चिम आफ्रिकी देश बुर्किना फासोमध्ये माणसे चक्क मगरींसोबत राहतात. तेही इतके सहज की जणू मगरी त्यांच्या घरातील पाळीव प्राणी आहेत. त्यांच्यातील हे नाते काही नवीन नाही. ६०० वर्षांचा इतिहास या नात्याला आहे. आता ही बाब पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्र ठरली आहे. स्थानिकांची सर्वात घातक आणि हिंस्र प्राण्यांपैकी एक मगरींसोबतकुटुंबियांसारखी वागणूक पाहून पर्यटक देखील हैराण होतात. कुठल्याही प्रकारच्या पिंजऱ्यात नव्हे, तर मगरी चक्क घर आणि अंगणात फिरतात.
crocodile1
१४ व्या शतकातील एक सत्यकथा येथील स्थानिकांमध्ये लोकप्रिय आहे. १४ व्या शतकापूर्वी बुर्किना फासो येथील बझूले गावात कुणीच राहत नव्हते. दुष्काळाचा कहर त्यावेळी होता. माणसांचा पदो-पदी जीव जात होता. याबाबत लोकांच्या मान्यतेनुसार, एका महिलेले त्याचवेळी मगरींनी एक खड्डा दाखवला. त्या ठिकाणी पाण्याचे साठे होते. आसपासच्या लोकांना पाण्याचा स्रोत मिळाला आणि हजारो लोकांचा जीव वाचला. तेव्हापासून आजपर्यंत येथे लोक मगरींसोबत वास्तव्य करत आहेत.
crocodile2
या मगरींची स्थानिक काळजी घेतात. त्यांच्यासाठी पाणी आणि खाण्याची व्यवस्था करतात. मगरींना नुकसान होऊ नये म्हणून लोक त्यांना शिकारींपासून सुद्धा वाचवतात. कारण, मगरींच्या कातडीला फॅशन मार्केटमध्ये मोठी मागणी आहे. त्यामुळे, हे स्थानिक मगरींच्या संरक्षणासाठी काहीही करू शकतात. केवळ बुर्किना फासोचे लोकच नव्हे, तर आफ्रिकेतील इतर देशांचे लोक सुद्धा मगरींना आपले पूर्वज माणून त्यांचा आदर सत्कार करतात. यापैकी काही मगरींचे वय ८० वर्षांपेक्षा जास्त आहे.

Leave a Comment