एअरटेलने आणला १९५ रूपयांचा जबरदस्त प्लॅन

airtel
नवी दिल्ली – अल्पवधीतच भारतीय टेलिकॉम क्षेत्रात रिलायन्स जिओने आपला दबदबा निर्माण केला आहे. अनेक आकर्षक प्लॅन आणत मोबाईल धारकांना जिओने आपल्याकडे खेचले आहे. जिओला टक्कर देण्यासाठी आता भारती एअरटेलने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी एक नवा प्लॅन सादर केला आहे. हा प्लॅन प्री-पेड ग्राहकांसाठी आहे.

१९५ रूपये नवीन एअरटेल रिचार्जची किंमत असून ग्राहकांना २८ दिवसांच्या या अनलिमिटेड प्लॅनमध्ये दररोज १.५ जीबी डेटा मिळेल. यासोबत अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि रोमिंग व्हाईस कॉलिंगची सुविधा असणार आहे. १९५ रूपयांच्या या प्लॅनमध्ये एसएमएस सुविधा देण्यात आली नाही. हा प्लॅन सध्या फक्त आंध्र प्रदेश, तेलंगना आणि केरळमध्ये अमंलात आणण्यात आला आहे. हा प्लॅन लवकरच मुंबईसह महाराष्ट्रात लागू होणार आहे.

Leave a Comment