मुंबई : भारतीय बाजारपेठेत अॅपल आपले सर्वात महागडे फोन XS आणि XS Max मॅक्स आणणार असून आता जीओची अॅपलच्या या दोनही फोनला मदत मिळणार आहे. कालपासून या फोनचे प्री-बुकिंग सुरु झाले असून याचे प्री-बुकिंग www.jio.com आणि रिलायंस डिजिटलच्या माध्यमातून करता येणार आहे. त्याचबरोबर हा फोन MyJio स्टोरवर आणि MyJio अॅप वरही उपलब्ध आहे.
आयफोन XS आणि XS Maxची प्री बुकिंग ‘जीओ’ वर झाली सुरू
या फोनमध्ये अॅपलने पहिल्यांदाच ड्युएल सीम कार्डची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याचबरोबर या दोनही फोनमध्ये प्रीपेड आणि पोस्टपेडची सुविधाही राहणार आहे. ग्राहकांना ड्युएल सीम कार्डमुळे फायदा होणार आहे. पहिल्यांदाच अशा प्रकारची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या फोनमध्ये ए१२ बायोनिक प्रोसेसर चिप असल्यामुळे फोनचा वेग ५० टक्क्यांनी वाढणार असल्यामुळे फेसआयडी जास्त अॅक्टिव्ह होणार असून फोन लवकर अनलॉक होणार आहे.