या महिलेने तब्‍बल २० मुलांना दिला आहे जन्‍म

family
बाळाला जन्म देणे ही वेस्टर्न कन्ट्रिजमध्ये दाम्पत्याने एक मोठी जबाबदारी मानली आहे. बाळापेक्षा त्‍यांना कुत्रे, मांजर सांभाळणे सोप वाटते. पण ब्रॅंडनमध्ये राहणा-या एका दाम्पत्याने २० मुलांना जन्‍म दिला आहे. ही सर्व मुले त्‍यांनी एकाच जोडीदारापासुन जन्‍माला घातली आहे. ब-याच वेळेस येथील लोक वेगवेगळया बायकांपासुन मुले जन्‍माला घालतात.
family1
काही महिन्यांपूर्वीच ब्रिटन मधील सर्वात मोठा परिवार ब्रॅडफोर्ट्सने आपल्‍या विसाव्‍या मुलाला जन्‍म दिला आहे. ते आता हे शेवटच मुल असल्‍याचे सांगतात. ते आता यानंतर बाळाला जन्‍म देणार नाहीत. ४२ वर्षांची पत्‍नी आणि पतीचे ४६ वर्षे वय असलेल्‍या जोडप्‍याने मागील तीस वर्षांत एक दोन नाही तर तब्‍बल २० मुलांना जन्‍म दिला आहे. हे कुटुंब ‘१९ किड्स एंड काउंटिंग’ या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या परिवारातील मोठा मुलगा हा २० वर्षांचा आहे तर सर्वात लहान मुलाचा काही महिन्यांपूर्वीच जन्‍म झाला. ब्रॅडफोर्ट्स परिवाराने कार्यक्रमात म्‍हटले, मुलांच्‍या आंघोळीसाठी कित्‍येक किलो शॅम्पू लागतो.
family2
ख्रिसमसमध्‍ये ३ टर्की, ३.५ किलो बटाटे, ५६ पुडिंग आणि असंख्‍य भाज्‍या आणल्यानंतर सर्वांचे पोट भरत असल्याचे हे दाम्पत्य सांगते. क्रिस आणि नोएल यांचे बालपणापासूनच एकमेकांवर प्रेम आहे. वयाच्‍या १४ व्‍या वर्षीच क्रिस पहिल्यांदा गर्भवती राहिली होती. आता तर त्‍यांना ३ नातवंडही आहेत. क्रिस आणि नोएल आपल्‍या मुलांवर एका वर्षात २६ लाख रूपये खर्च करतात. त्‍यांच्‍या वाढदिवस आणि परदेशांमधील सुटीच्या खर्चाचा यामध्ये समावेश आहे.

Leave a Comment