१ हजार अमेरिकन तंत्रज्ञांना इन्फोसिस देणार नोकरीची संधी

infosys
बंगळुरू – १ हजार अमेरिकन तंत्रज्ञांची नियुक्ती करणार असल्याचे इन्फोसिस या आघाडीच्या सॉफ्टवेअर कंपनीने जाहीर केले. अमेरिकेतील अॅरिझोना राज्यातून हे तंत्रज्ञ निवडले जाणार आहेत. १० हजार अमेरिकन तंत्रज्ञांना इन्फोसिसने नोकरीची संधी देणार असल्याचे यापूर्वी जाहीर केले होते.

आश्वासन दिल्याप्रमाणे आम्ही ५ हजार ८७४ अमेरिकन नागरिकांना नोकरीत घेतले असल्याचे इन्फोसिसने म्हटले आहे. तेथील विकास प्रक्रियेला गती मिळावी व स्थानिकांच्या बुद्धिमत्तेला संधी मिळण्यासाठी अॅरिझोना राज्यातील ही गुंतवणूक आहे. तसेच इन्फोसिसने आयटी कौशल्यातील उणीव भरून काढणार असल्याचेही म्हटले आहे.

स्वयंचलित तंत्रज्ञान, आयओटी, डाटा सायन्स आणि सायबर सुरक्षेवर अॅरिझोना हबमधून लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. डोनाल्ड प्रशासनाने एच १ बीच्या व्हिसाचे कडक नियम केल्यानेही इन्फोसिसने अमेरिकन तंत्रज्ञांनाना नोकरीत प्राधान्य दिल्याचेही दिसून येत आहे.

Leave a Comment