शरीराची बळकटी वाढविण्यास घरच्या घरी बनवा प्रोटीन शेक

protine
आजकाल फिटनेस बद्दल लोक जागरूक आहेत. शरीराची बळकटी वाढविणे असो, वजन घटविणे किंवा वाढविणे असो, किंवा एकंदर शरीराच्या आरोग्याच्या दृष्टीने असो, व्यायामाच्या आवश्यकतेचे महत्व लोकांना पटू लागले आहे. त्यामुळे योग्य वर्कआउट बरोबरच योग्य आहार आणि योग्य पूरक आहार, म्हणजेच सप्लिमेंटस् यांचे ही महत्व वाढले आहे. व्यायाम करीत असताना स्नायूंना बळकटी यावी, तसेच वजन नियंत्रणात राहावे या करिता आहारामध्ये प्रथिने जास्त महत्वाची आहेत. शरीराला आवश्यक असणारी प्रथिने सहजी मिळविण्याचा सोपा पर्याय बाजारातील तयार प्रोटीन पावडर्सच्या रूपाने आता उपलब्ध आहे. अश्या प्रकारच्या प्रोटीन पावडर्स घेणे हे शरीराच्या दृष्टीने लाभकारी असले, तरी यामध्ये कृत्रिम तत्वे असण्याची शक्यता असते. त्याशिवाय या पावडर्सची चव चांगली असावी या करिता कृत्रिम ‘टेस्ट एनहान्सार्स’ आणि प्रिझर्व्हेटिव्हजचा वापर यामध्ये केलेला असतो. त्यामुळे या कृत्रिम वस्तूंचे दुष्परिणाम कालांतराने शरीरावर होण्याची शक्यता असते.
protine1
पण मग शरीराला आवश्यक असणारी प्रथिने मिळविण्यासाठी काय करायचे? तर यासाठी अनेक नैसर्गिक पदार्थ आपल्या आहारामध्ये समाविष्ट करून शरीराला नैसर्गिक रित्या प्रथिने मिळवून द्यायची. हे करण्यासाठी घरच्या घरी प्रोटीन शेक्स तयार करता येतात. यामध्ये वापरण्यात येणारे सर्व पदार्थ संपूर्णपणे नैसर्गिक असून, त्यांपासून शरीराला कोणताही अपाय होण्याचा धोका उद्भविण्याची शक्यता कमी असते. हे प्रोटीन शेक्स घरच्याघरी तयार करून यांचे सेवन केल्यास व्यायामासाठी आवश्यक उर्जा मिळेलच, त्याशिवाय स्नायूंना देखील बळकटी आणि शरीराला पोषणही मिळेल.
protine2
बदाम प्रथिनांचे उत्तम स्रोत आहेत. तीस ग्राम बदामांमध्ये सहा गरम प्रथिने असतात. तसेच दुध आणि अळशीच्या बिया यांमध्ये ही प्रथिनांची मात्र मुबलक असते. बदाम वापरून प्रोटीन शेक बनवायचा असल्यास त्यासाठी वीस बदाम, दोन कप पाणी, सुक्या खोबऱ्याचा थोडा कीस, एक चिमुट दालचिनी पूड, एक चमचा अळशीच्या बिया (flaxseeds), आणि दोन कप दुध या साहित्याची आवश्यकता आहे. हा शेक तयार करण्यासाठी बदाम आणि सुके खोबरे रात्रभर पाण्यामध्ये भिजत घालावे. आणि सकाळी मिक्सरवर वाटून घेऊन याची जाडसर पेस्ट बनवावी. त्यानंतर यामध्ये दोन कप दुध, अळशीच्या बिया आणि दालचिनी पूड घालवी. बदाम प्रोटीन शेक अश्या तऱ्हेने बनविता येईल.
protine3
या शिवाय स्ट्रॉबेरी जेव्हा बाजारामध्ये मिळतात, तेव्हा स्ट्रॉबेरी आणि आणि सोया मिल्क (सोयाबीन पासून तयार केले गेलेले दुध. हे बाजारामध्ये उपलब्ध असते.)वापरूनही प्रोटीन शेक करता येईल. सोया मिल्क प्रथिनांचे उत्तम स्रोत आहे. ‘मसल मास'(स्नायूंची ताकद, आणि घनता) वाढविण्याच्या दृष्टीने सोया मिल्क्चे सेवन करणे चांगले. त्यामुळे सोया मिल्क किंवा सोया मिल्क वापरून बनविलेल्या प्रोटीन शेक्स् चे सेवन व्यायामानंतर करावे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment