ह्युंडईच्या नव्या कारचे नामकरण करा आणि कार जिंका

hyundai
ह्युंडई या कार निर्मात्या कंपनीला आपल्या नव्या कारचे नाव काय असणार? हा प्रश्न पडला असल्यामुळे कंपनीने कारचे नामकरण करा आणि नवी कोरी कार जिंका अशी भन्नाट ऑफर आणली आहे.

लवकरच आपली लोकप्रिय कार सॅन्ट्रो ह्युंडई नव्या रुपामध्ये आणणार आहे. ग्राहकांनीच या कारसाठी नाव सुचवावे असे अनोखे अभियान कंपनीकडून सुरू करण्यात आले आहे. तुम्हीही HyundaiNaamkaran.com या संकेतस्थळावर जाऊन यामध्ये सहभागी होऊ शकतात. संकेतस्थळावर गेल्यावर एएच2 सॅन्ट्रो (कोडनेम) या गाडीसाठी तुम्हाला जे नाव सुचवायचे असेल ते तुम्ही सुचवू शकतात. त्यानंतर ज्या नावाला सर्वाधिक मत पडतील त्या नावावर शिक्कामोर्तब केले जाईल आणि एका लकी विजेत्याला तिच कार बक्षीस म्हणून दिली जाईल.

संकेतस्थळावर नाव सुचवण्याची प्रक्रिया सुरू असून सॅन्ट्रो या नावालाच अधिकांश ग्राहकांनी पसंती दर्शवली आहे. दोन लाखांहून जास्त जणांनी सॅन्ट्रोलात आपली पसंती दर्शवली आहे. तर, दुसऱ्या क्रमांकावर आय-५, तिसऱ्या क्रमांकावर स्प्लॅश आणि चौथ्या क्रमांकावर सानियॉन हे नाव असल्यामुळे सॅन्ट्रो या नावावरच शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे.

१० ऑक्टोबरपासून कंपनीच्या या कारची आगाऊ नोंदणी सुरू होणार असून ही कार २३ ऑक्टोबरला लॉन्च होणार आहे. साडेतीन ते साडेचार लाख रुपयांपर्यंत या नव्या कारची किंमत असण्याची शक्यता आहे. भारतीय बाजारात मारुती सुझूकी सिलेरियो, वॅगनआर, टाटा टियागो आणि रेनॉ क्विड 1.0 या गाड्यांना ह्युंडईच्या या नव्या कारकडून टक्कर मिळू शकते.

Leave a Comment