एअर एशिया इंडिया घडवत आहे ५०० रुपयांत विमान प्रवास

air-asia
बंगळूरू – आता बस आणि रेल्वेप्रवासापेक्षाही विमान प्रवास करणे स्वस्त झाले आहे. फक्त ५०० रुपयात तुम्ही विमान प्रवास करण्यासाठी तिकिट बुक करू शकता. आतापर्यंतच्या एअरलाईन इंडस्ट्रीमधील सर्वात स्वस्त ही सेवा असणार आहे. ही खास ऑफर एअर एशिया इंडियाने आणली असून या ऑफरची नुकतीच कंपनीकडून घोषणा करण्यात आली आहे. रविवारपासून ही ऑफर सुरू होणार असल्याचेही कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

या ऑफरनुसार, देशातील २१ ठिकाणांचा प्रवास करण्यासाठी तुम्ही तिकिट बुक करू शकता. तुम्ही यासाठी कमीत कमी ५०० रुपयात तिकिट बुक करू शकता. यासोबतच तुम्ही इतरही अनेक ठिकाणी जाण्यासाठी १००० आणि १५०० रुपयात तिकिट बुक करू शकता.

एअरलाईन्सने याबाबत दिलेल्या माहितीनुसार, ही ऑफर या एअरलाईन्सच्या सर्व फ्लाईट्ससाठी लागू असेल. तुम्ही १७ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर दरम्यान या ऑफरसाठी तिकिट बुक करू शकता. सोबतच १७ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर, २०१९ पर्यंत यात्रेच्या तिकिट्स या दरम्यान काढू शकता. एअर एशियाचे मार्केटिंग हेड राजकुमार प्रनाथमन म्हणाले, की आम्ही आमच्या प्रमोशनल ऑफरच्या माध्यमातून लोकांना विमान प्रवासाचा आनंद देऊ इच्छित आहोत आणि तेही स्वस्त दरात. या ऑफरच्या माध्यमातून तुम्ही अमृतसर, बागडोगरा, विशाखापट्टनम, सुरत, श्रीनगर, रांची, पुणे, पणजी, नवी दिल्ली, नागपूर, कोच्ची, कोलकत्ता, इंदौर, इंफाळ, हैदराबाद, गुवाहाटी, चेन्नई, चंदीगड, भुवनेश्वर, बेंगलोर या शहरांचा प्रवास करू शकता. मात्र, या ऑफरबद्दल एअरलाईनच्या वेबसाईटवर अद्याप कोणत्याच प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही.

Leave a Comment