तब्बल १९ कोटी डॉलरला जगप्रसिद्ध ‘टाइम’ मासिकाची विक्री

times
‘सेल्सफोर्स’ कंपनीला ‘मेरेडिथ कॉर्प’ या अमेरिकी कंपनीने जगप्रसिद्ध ‘टाइम’ मासिक १९ कोटी डॉलरमध्ये विकले आहे. आता ‘टाइम’ मासिकाचे ‘सेल्सफोर्स’चे सह-संस्थापक मार्क बेनीऑफ आणि त्यांची पत्नी नवे मालक असणार आहेत.

याबाबत ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ने दिलेल्या वृत्तानुसार, हे मासिक ‘सेल्सफोर्स’च्या चार सह-संस्थापकांपैकी एक मार्क बेनीऑफ आणि त्यांच्या पत्नीने विकत घेतले आहे. ‘क्लाउड कंप्यूटिंग’ मधील सेल्सफोर्स ही दिग्गज कंपनी आहे. हा सौदा १९० मिलियन डॉलरमध्ये झाल्याचे ‘मेरेडिथ’कडून सांगण्यात आले आहे. पण बेनीऑफ यांचा पत्रकारितेशी निगडीत लिखाण आणि निर्णयांमध्ये हस्तक्षेप नसेल, त्याबाबतचे सर्व निर्णय टाइमचे सध्याचे कार्यकारी मंडळच घेईल असेही ‘मेरेडिथ’ने स्पष्ट केले आहे. टाइम इन्कच्या चार मासिकांना विकण्याची घोषणा मेरेडिथ कॉर्पने मार्च महिन्यामध्ये केली होती. ‘टाइम’च्या विक्रीनंतर आता उर्वरित फॉर्च्यून, मनी आणि स्पोर्ट्स इलस्ट्रेटेड या मासिकांच्या विक्रीबाबतही चर्चा सुरू आहेत.

Leave a Comment