एअरटेलची आणखी एक धमाकेदार ऑफर

airtel
मुंबई : भारती एअरटेलने रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी आणखी एक धमाकेदार ऑफर आणली असून ४१९ रुपयांचा नवा प्लान एअरटेलने लॉन्च केला आहे.

सर्वाधिक १०५ जीबी डेटा एअरटेलच्या नव्या प्लानवर मिळणार आहे. ७५ दिवसांची या प्लानची व्हॅलिडीटी आहे. १.४ जीबी डेटा ग्राहकाला दिवसाला वापरता येणार आहे. ही ऑफर एअरटेलच्या वेबसाईट आणि अॅपवर मिळणार असून ३९९रुपयांच्या आणि ४४८ रुपयांच्या एअरटेलच्या ऑफर आहेत. ७० दिवस आणि ८२ दिवस याची व्हॅलिडीटी आहे.

४१९ रुपयांच्या ऑफरमध्ये एअरटेल ग्राहकाला अनलिमिटेड कॉल मिळणार आहेत. पण दिवसाला ३०० मिनिट आणि आठवड्याला एक हजार मिनिटांपर्यंतच बोलता येईल. या प्लानमध्ये फ्री रोमिंग आणि दिवसाला १०० एसएमएसही मिळणार आहेत. एअरटेल टीव्ही अॅप आणि विंक म्यूझिकचे सबस्क्रिप्शनही फ्री असणार आहे.

Leave a Comment