लवकरच स्मार्ट टीव्ही घेऊन येत आहे ‘वनप्लस’

oneplus
स्मार्टफोन बाजारपेठेतील वनप्लसने आता टीव्ही बाजारपेठेत प्रवेश करण्याचा निर्णय गेतला असून कंपनीचे संस्थापक पीट लॉऊ यांनी कंपनीच्या वेबसाईटवर लिहीलेल्या एक ब्लॉगमधून यासंदर्भातील घोषणा केली आहे. केवळ स्मार्टफोन क्षेत्रामध्ये आजपर्यंत असणारी आमची कंपनी लवकरच स्वत:चा पहिला स्मार्ट टीव्ही बाजारात घेऊन येणार आहे. पीट लॉऊच या स्मार्ट टीव्ही विभागाचे सर्व काम पाहणार असल्याचे या पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.

आमचा स्मार्टफोनचा व्यवसाय आम्ही वाढवत असून आम्ही आता टीव्ही क्षेत्रात उडी घेणार आहोत. आम्ही या उद्योगामध्ये ‘अ कनेक्टेड ह्युमन एक्सपिरियन्स’साठी येत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. वन प्लस टीव्हीच्या माध्यमातून स्मार्टफोनचा वापर जसा सहजरित्या करण्यासाठी आम्ही वेगवेगळे प्रयोग करत यश मिळले तशीच क्रांती आम्ही टीव्ही क्षेत्रात करणार आहोत असे या ब्लॉगमध्ये म्हटले आहे. केवळ चित्रपट हा स्मार्ट टीव्ही दाखवणार नाही तर त्याहून अधिक जास्त कामे तो करणार आहे. कारण बैद्धिक संवाद साधण्याचे टीव्ही हे उत्तम माध्यम असल्याचे मत पीट यांनी मांडले आहे.

पीट या ब्लॉगमध्ये चार प्रकारच्या वातावरणामध्ये एखाद्या व्यक्तीला सतत कनेक्टेड रहावेसे वाटते असे म्हणतात. पहिली जागा म्हणजे घर, दुसरी ऑफिस तिसरी संवाद साधण्यासाठी आणि चौथी प्रवासात असताना. हा स्मार्ट टीव्ही म्हणजे फोन आणि टीव्हीची कनेक्टीव्हीटी घराबाहेर घेऊन जाणारा पहिलाच टिव्ही असण्याची शक्यता यावरून सध्या व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment