अनावश्यक कामे करण्यात निघून जातो सरकारी कर्मचाऱ्यांचा वेळ

time
मुंबई : क्रोनोज संस्थेने ऑस्ट्रेलिया, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, भारत, मॅक्सिको आणि ब्रिटनमध्ये २८०० कर्मचाऱ्यांचे ३१जुलै ते ९ ऑगस्ट या दरम्यान सर्वेक्षण केले. त्यात जगातील १० पैकी ९ कर्मचाऱ्यांचा वेळ हा अनावश्यक कामे करण्यात निघून जातो. हे कर्मचारी असे काम करतात ज्याची जबाबदारी त्यांची नाहीच आहे. चुकीच्या कामात ४१ टक्के फूल टाइम असलेले कर्मचारी हे आपला वेळ घालवतात. तर ४० टक्के कर्मचारी हे अशी काम करतात ज्याचा फायदा त्यांना किंवा त्यांच्या संस्थेला होतच नाही.

सर्वेक्षणात अशी बाब समोर आली आहे की, आपल्या वेळेपेक्षा अधिक काम करण्याला ५३ टक्के कर्मचारी हे एक प्रकारचे प्रेशर समजतात. हा आकडा भारतात सर्वाधिक असून त्याचे प्रमाण ६२ टक्के आहे तर फ्रान्समध्ये ६६ टक्के आहे. अशा वेळी त्यांच्याकडून उत्कृष्ठ काम होत नाही. कॅनडात ३२ टक्के, अमेरिकेत ४४ टक्के आणि ऑस्ट्रेलियात ४७ टक्के लोक अधिक काम करण्यामुळे दबाव निर्माण होत असल्याचे सांगतात.

फक्त मिटींग करण्यात सर्वाधिक वेळ म्हणजे २७ टक्के वेळ हा जातो. प्रशासकिय कार्यात २७ टक्के मिटिंगमध्ये जातो तर २६ टक्के वेळ सहकाऱ्यांशी बोलण्यात जातो तर ई मेल आदान प्रदान करण्यात २६ टक्के निघून जातात. तर महत्वाची बाब म्हणजे २२ टक्के लोक ही चर्चा करण्यात खालवतात की त्यांच्यामुळे हे काम खराब झालेले नाही.

Leave a Comment