सांगलीतील या ‘गाव’च्या मशिदीत गेल्या ३८ वर्षांपासून होते गणपती बाप्पांचे आगमन

sangali
सांगली : हिंदू मुस्लीम ऐक्याचे प्रतीक म्हणून सांगली जिल्ह्यातील गोटखिंडी या गावाची ओळख आहे. या गावातील दोन्ही समुदायाचे लोक मशिदीत गणपती बसवतात. ही परंपरा गेल्या ३८ वर्षांपासून सुरू आहे. यावर्षी गणेशोत्सव आणि मोहरम एकत्र आला असून हा उत्सव न्यू गणेश तरूण मंडळाच्या वतीने साजरा केला जातो. हिंदूंसह मुस्लीम बांधवही उत्साहात गणेशाची मनोभावे पूजा अर्चा करतात. दोन्ही समुदायाचे नागरिक गणेशाच्या आरतीच्या वेळेस सहभागी होतात. यावर्षी वाळव्याचे प्रांताधिकारी नागेश पाटील यांच्या हस्ते आरती करून गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली.

सर्वत्र हिंदू आणि मुस्लीम ऐक्याच प्रतीक असलेल्या न्यू गणेश तरुण मंडळाच्या या गणेशोत्सवाचे कौतूक होत असून या मंडळामार्फत धार्मिक आणि सामाजिक उपक्रम राबावले जात आहेत. गणपती आणि बकरी ईद मागच्या वर्षी एकत्र साजरा करण्यात आला. नमाज पठण करून मुस्लीम बांधवांनी ईद साजरी केली. पण गणेशोत्सव असल्यामुळे बकऱ्याची कुर्बानी दिली नव्हती. गणेशविसर्जन झाल्यावर बकरी ईद साजरी केली.

Leave a Comment