व्हॉट्सअॅपचे नवे फीचर घेणार यूजरच्या डोळ्यांच्या काळजी

whatsapp
मुंबई : आपल्या यूजरच्या गरजा लक्षात घेत वेळोवळी व्हॉट्सअॅपने आपल्या अॅपमध्ये गरजेचे बदल केले आहेत. व्हॉट्सअॅप सध्या नेहमी नवनवीन फीचर आणल्यामुळे सर्वाधिक लोकप्रिय सोशल मेसेजिंग अॅप आहे. पुन्हा एकदा आपल्या यूजरसाठी व्हॉट्सअॅपने नवीन फीचर आणण्याची तयारी दाखवली आहे.

आपल्या यूजरसाठी लवकरच व्हॉट्सअॅप आणखी एक अपडेट घेऊन येत आहे. WABetaInfoच्या वृत्तानुसार नवीन अपडेटनंतर व्हॉट्सअॅपमध्ये आपल्याला ‘डार्क मोड’ हा पर्याय दिसणार आहे. यावर्षाच्या शेवटी व्हॉट्सअॅप हे फीचर घेऊन येण्याच्या तयारीत आहे. यूट्युब, ट्विटर, डिस्कोर्ड आणि रेडडिटसारख्या अॅप्समध्ये ‘डार्क मोड’चा पर्याय व्हॉट्सअॅपच्याआधी देण्यात आला आहे.

‘WABetaInfo’च्या माहितीनुसार, सध्या डार्क मोड फीचरवर व्हॉट्सअॅपकडून काम सुरू आहे. आपल्या नव्या अपडेटमध्ये व्हॉट्सअॅप हे नवे फीचर आणण्याच्या तयारीत आहे. लवकरच अॅन्ड्रॉई़ड फोन, आयफोन एक्समध्ये हे नवे फीचर पाहायला मिळण्याची शक्यता आहे. या नव्या फीचरबाबत व्हॉट्सअॅपने ऑफिशिअली कोणतीही घोषणी केलेली नाही. पण या नव्या डार्क मोड फीचरची घोषणा लवकरच व्हॉट्सअॅपकडून होण्याची शक्यता आहे. या नव्या अॅपच्या मदतीने मोबाईलमधील लाईट कमी होऊन यूजर्सच्या डोळ्यांवरील ताण होणार आहे. यूजर्सच्य डोळ्यांना जास्तीत जास्त आराम मिळावा, यूजरच्या डोळ्यांची काळजी घेणे हा मुख्ये हेतू या नव्या फीचरचा आहे.

Leave a Comment