गुगलचा एम. विश्वेश्वरय्या यांना ‘इंजिनीअर्स डे’च्या निमित्ताने सलाम

google
आज भारतरत्न डॉ. मोक्षगुंडम् विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याला सलाम करत इंजिनीअर्स डे साजरा करण्यात येत आहे. या खास दिवसाचे औचित्य साधत गुगलनेही त्यांच्या अभियांत्रिकी कौशल्याला सलाम करण्यासाठी एक खास डूडल तयार केले आहे.

गुगलने आपल्या कामातच परमेश्वर शोधण्याच्या मंत्रालाच जीवनाचा मंत्र मानणाऱ्या विश्वेश्वरय्या यांना मानवंदना देण्यासाठी साकारलेल्या डूडलमध्ये त्यांचे चित्र रेखाटण्यात आले आहे. एक पूल ज्यामध्ये दिसत असून, गुगल ही अक्षरे त्यावर स्पष्टपणे दिसत आहेत. गुगलकडून अतिशय कलात्मकपणे आणि साजेसे असे हे डूडल साकारण्यात आले आहे.

भारतरत्न डॉ. मोक्षगुंडम् विश्वेश्वरय्या यांनी भारताच्या सर्वांगीण विकासासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. १५ सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस ‘इंजिनीअर्स डे’ म्हणून साजरा होतो. धुळय़ात विश्वेश्वरय्यांच्या कारकिर्दीची मुहूर्तमेढ झाली. ते १८८४ ते १९०८ पर्यंत मुंबईच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात (पीडब्ल्यूडी) सहाय्यक इंजिनीअर होते.

Leave a Comment