जिओच्या जुन्या फिचरफोनमध्ये सुरु झाली व्हॉट्सअॅपची सेवा

jio
मुंबई : रिलायन्स जिओच्या दोन्ही मोबाईलमध्ये व्हॉट्सअॅपची सेवा सुरु झाली असून व्हॉट्सअॅपने जिओ फोनसाठी नवीन व्हर्जन तयार केले आहे. काय ऑपरेटिंग सिस्टीम (KaiOS)ला हे व्हर्जन सपोर्ट करते. व्हॉट्सअॅपचे हे नवीन व्हर्जन जिओ फोनमध्ये १० सप्टेंबरपासून उपलब्ध झाले आहे. जिओच्या सगळ्या फोनवर २० डिसेंबरपासून व्हॉट्सअॅप उपलब्ध होईल. आता भारतातील जिओचे कोट्यवधी ग्राहक व्हॉट्सअॅप वापरू शकतात, असे व्हॉट्सअॅपचे उपाध्यक्ष क्रिस डॅनियल यांनी सांगितले.

व्हॉट्सअॅप जिओ फोनमध्ये डाऊनलोड करण्यासाठी आधी तुमचा प्लान पाहा. तुमच्या जिओ फोनचा प्लान जर संपला असेल तर इंटरनेट चालणार नाही. प्लान सुरु असेल तर इंटरनेट ऑन करा आणि व्हॉट्सअॅप डाऊनलोड करा. जिओ फोनवर व्हॉट्सअॅप डाऊनलोड करण्यासाठी सगळ्यात आधी जिओ फोनमधल्या App Storeवर क्लिक करा. तुम्हाला फेसबूक, व्हॉट्सअॅप, युट्यूबसोबत व्हॉट्सअॅप दिसेल. व्हॉट्सअॅपसमोर असलेल्या डाऊनलोड लिंकवर क्लिक करा. व्हॉट्सअॅप डाऊनलोड केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकून व्हॉट्सअॅप अॅक्टीव्ह करा.

Leave a Comment