एक असे उपकरण संशोधकांनी शोधून काढले आहे की ते अगदी सुदृढ आणि मजबूत शुक्राणुंना ओळखू शकतो. चांगल्या स्पर्मचा काऊंट शोधणे आतापर्यंत अतिशय कठीण आणि थकवणारे काम होते. या टेस्टमध्ये आतापर्यंत अनेक तास लागायचे यामुळे स्पर्मची गुणवत्ता कमी होण्याची शक्यता होती. पण तो प्रश्न देखील या संशोधनामुळे सुटला आहे.
या नव्या उपकरणामुळे स्पर्मची क्वालिटी ओळखणे सहज शक्य
याबाबत अमेरिकेतील कॉरनेल युनिर्व्हसिटीच्या मुख्याध्यापिका अलिरेजाने सांगितले की, या आधी चांगल्या क्वालिटीचे स्पर्म ओळखण कठिण होते. पण स्पर्म काऊंट ओळखणे या नव्या उपकरणामुळे सहज शक्य आहे. अनेक तासांचे काम या उपकरणामुळे अगदी सहज ५ मिनिटांत होणार आहे. चांगले स्पर्म तेच मानले जातात जे फ्लोच्या विरूद्ध दिशेला टिकून राहतात. यामुळे सर्वात प्रथम मायक्रेफ्लूडित चॅनल बनवले. ज्यामध्ये स्पर्म तरंगतात आणि ही प्रक्रिया भिंतीप्रमाणे करते ज्यांमध्ये चांगले स्पर्म एका बाजूला होतात. हा रिसर्च पीएनएएस नावाच्या जर्नलमध्ये छापला आहे.
Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही