टाटा क्लिकवर शाओमीच्या नोट ५ प्रोसह इतर फोनवर भरघोस सवलत

tatacliq
मुंबई : आपल्या फोन्सची ऑनलाईन विक्री करुन चीनची शाओमी हि मोबाईल उत्पादक कंपनी मोठमोठ्या कंपन्यांना टक्कर देत आहे. कंपनीकडून ग्राहकांना फोन ऑनलाईन खरेदी करण्यासाठी ऑफरही देण्यात येत आहेत. यातच आता ई कॉमर्स वेबसाईट टाटा क्लिकने शाओमीच्या रेड मी नोट ५ प्रो आणि नुकत्याच लाँच झालेल्या एमआय A2 वर ऑफर दिली आहे.

या ऑफरचा लाभ www.tatacliq.com या ऑफिशिअल वेबसाईटवर जाऊन घेता येईल. भारतात रेडमी नोट ५ प्रो या फोनला मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली आहे. हा फोन खरेदी करण्यासाठी अनेकांना मोठी कसरत करावी लागली. कारण, फोनचा सेल सुरु होताच तो आऊट ऑफ स्टॉक होत होता.

या वेबसाईटवर एचडीएफसी डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर करुन रेडमी नोट ५ प्रो आणि एमआय A2 हे फोन खरेदी केल्यास १० टक्के डिस्काऊंट दिला जात आहे. या ऑफरअंतर्गत ग्राहकांना कमीत कमी १५०० रुपयांपर्यंत सूट मिळेल. त्याचबरोबर २४ महिन्यांच्या ईएमआयवर फोन खरेदीचाही पर्याय असेल.

रेडमी नोट ५ प्रो च्या दोन्हीही व्हेरिएंटवर (१४९४८ रुपये आणि १७४९९ रुपये) ही ऑफर आहे. तर Mi A2 च्या बेस व्हेरिएंटवर ही ऑफर आहे, ज्याची किंमत टाटा क्लिकनुसार, १७ हजार ४९९ रुपये आहे. या ऑफरचा लाभ तुम्ही १४ सप्टेंबरपर्यंत घेऊ शकता.

Leave a Comment