मुकेश अंबानी यांची पुन्हा जोरदार शॉपिंग

kharedi
आशियातील सर्वात श्रीमंत आणि देशातील बडे उद्योजक रिलायंस इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचा शॉपिंग फिव्हर अजून वाढला असून यांनी नुकत्याच सहा कंपन्यात हिस्सा खरेदी केला आहे. रिलायंस उद्योगाची उपकंपनी रीलायन्स रिटेल बेन्चर्स लिमिटेड कडून हि खरेदी केली गेली असून त्यामुळे ब्रान्डेड कपडे उद्योगात कंपनीचा पाया मजबूत केला जात आहे.

रिलायंसने रेडीमेड गारमेंट क्षेत्रातील जेनिसीस कलर्स लिमी. कंपनीत १६.३१ टक्के हिस्सा खरेदी केला असून त्यासाठी ३४. ८० कोटी रुपये मोजले आहेत. त्याचबरोबर आणखी पाच कंपन्यात हिस्सा खरेदी करण्यासाठी ५७.०३ कोटी रुपये मोजले आहेत. या पाच कंपन्यात ब्रान्डेड रेडीमेड गारमेंट बरोबर बॅग्ज, फुटवेअर, अॅक्सेसरीज क्षेत्रातील रिटेल व होलसेल कंपन्या आहेत. जीएलएफ लाईफ स्टाईल ब्रांड, जीएमएल इंडिया फॅशन, जीबीएल बॉडी केयर या कंपन्यांचा समावेश आहे.

Leave a Comment