पोस्ट विभाग सुरु करणार स्वतंत्र विमा कंपनी

post
भारतीय पोस्ट विभाग पेमेंट बँक आणि पार्सल सेवेनंतर आता स्वतंत्र विमा कंपनी स्थापन करण्याबाबत विचार करत असल्याचे केंद्रीय दळणवळण मंत्री मनोज सिंन्हा यांनी सांगितले. येत्या दोन वर्षात हि कंपनी सुरु होईल. पोस्ट विभाग विविध प्रकारच्या नवीन सेवा सुरु करून कायापालट करण्यासाठी प्रयत्नशील असून विमा कंपनी हे त्याचेच एक रूप आहे. त्यासाठी सल्लागाराची नियुक्ती लवकरच केली जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ सप्टेंबरला पोस्ट पेमेंट बँक सेवेचा शुभारंभ केला असून देशभरात हि बँक कार्यान्वित झाली आहे. ग्रामीण तसेच दुर्गम भागातील नागरिकांना यामुळे घरपोच बँक सेवा मिळणार असून ३ लाख पोस्टमन या कामी काम करणार आहेत. एप्रिल मध्ये पोस्टाने पार्सल सेवा सुरु केली आहेच. सध्या पोस्ट जीवन विमा सेवा देत असून हि सर्वात जुनी विमा पॉलिसी मानली जाते. तिची सुरवात १८८४ मध्ये झाली होती.

Leave a Comment