देशात वाहतुकीसाठी बनणार दोन सीटर विमाने

hanse
बंगलोरचा नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरिज आणि दिल्लीच्या मेसको एरोस्पेस लिमिटेड कंपनी मध्ये नुकत्याच झालेल्या सहकार्य करारानुसार देशत दोन सीटर विमाने तयार केली जाणार असून हंस एनजी या नावाने हि विमाने विक्रीसाठी २०१९ मध्ये बाजारात आणली जाणार आहेत. हि विमाने हंस ची नेक्स्ट जनरेशन विमाने असून त्याच्या बेसिक मॉडेलची किंमत ८० लाख रुपये तर हाय एंड मॉडेलची किंमत १ कोटी रुपये असेल असे समजते.

या विमानांना अॅडव्हांस इंजिन दिले जाणार आहे. यामुळे इंधन बचत होईल. त्याचबरोबर डिजिटल डिस्प्ले, सामानासाठी वेगळी जागा, उत्तम डिझाईनचे दरवाजे आणि चांगल्या प्रतीचे इंटिरियर असेल. ११ ते १३ महिन्यात हि विमाने तयार होणार आहेत आणि २०२० मध्ये त्याच्या व्यावसायिक उड्डाणासाठी परवाना मिळविला जाणार आहे. देश विदेशात या विमानांची सर्व्हिस सेंटर उभारली जाणार असून देशात सध्या अश्या ७० ते ८० विमानांची गजर असल्यचे सांगितले जात आहे.

Leave a Comment