५ रुपयांचे डेअरी मिल्क खा आणि १ जीबी डेटा मिळवा

JIO
मुंबई : रिलायन्स जिओ सध्या आपला दुसरा वार्षिकोत्सव साजरा करत असून कंपनीने यासाठी आपल्या युजर्ससाठी खास ऑफर आणली आहे. ५ रुपयांच्या चॉकलेटसोबत जिओ आपल्या यूजर्ससाठी १ जीबी डेटा देत आहे.

तुम्हाला फ्री डेटा मिळविण्यासाठी फक्त कॅडबरी डेअरी मिल्क चॉकलेटचे रिकामी पॅकेट लागणार आहे. डेअरी मिल्क क्रॅकल, डेअरी मिल्क रोस्ट बदाम, डेयरी मिल्क फ्रूट अॅण्ड नट आणि डेयरी मिल्क लिकेबल्ससोबत हा फ्री डेटा मिळत आहे. मोफत डेटासोबत रिलायन्स जिओने यूजरला दूसऱ्या जिओ सबस्क्राय्सला फ्री डेटा ट्रान्स्फरची सुविधा दिली आहे. ही ३० सप्टेंबर २०१८ पर्यंत ऑफर असून तुमच्याकडे MyJio अॅप असणे गरजेचे आहे.

मोफत डेटा ऑफरचा बॅनर माय जिओ अॅपच्या होमस्क्रिनवर लाईव्ह झाला आहे. तुम्ही त्यावर क्लिक केल्यावर पेज उघडले जाईल. तिथल्या Participate Now बटणावर क्लिक करा. यानंतर डेअरी मिल्कच्या रिकामी पॅकेटवरील बारकोड स्कॅन करुन मोफत डेटा मिळवावा लागेल. अॅक्टिव युजर्स हा डेटा स्वत: वापरू शकतात किंवा दुसऱ्यालाही पाठवू शकतात. मोफत डेटा माय जिओ अॅपवर ७ ते ८ दिवसात येईल. यानंतर जिओ अॅपवर केवळ रॅपरच्या मदतीनेच फ्री डेटा मिळवला जाऊ शकतो.

Leave a Comment