प्रीपेड ग्राहकांसाठी व्होडाफोनचा लाँग व्हॅलिडीटी प्लॅन

vodafone
नवी दिल्ली – प्रीपेड ग्राहकांसाठी व्होडाफोनने लाँग व्हॅलिडीटीचा प्लॅन लाँच केला आहे. फीचर फोन ग्राहकांना या प्लॅनमध्ये १६८ दिवसांची व्हॅलिडीटी मिळणार आहे तर ११२ दिवसांची व्हॅलिडीटी स्मार्टफोन ग्राहकांना मिळणार आहे.

ग्राहकांना या प्लॅनमध्ये अनलिमिटेड वॉईस कॉलिंग आणि इंटरनेट मिळणार आहे. व्होडाफोनच्या ५९७ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांनी रोज २५० मिनीटे आणि आठवड्याला १००० मिनीटे कॉलिंग मिळणार आहे. ग्राहकांना या प्लॅनतंर्गत १० जीबी ४जी / ३जी इंटरनेट मिळेल. भारती एयरटेलनी सर्वात आधी ५९७ रुपयांचा प्लॅन लाँच केला होता. यात स्मार्टफोन ग्राहकांना ११२ दिवसांची व्हॅलिडीटी मिळते. व्होडाफोन आणि एअरटेलचा प्लॅनमध्ये समान फायदे आहेत.

Leave a Comment