टेक्सासमधील रेस्टॉरंटमध्ये चाखावयास मिळत आहे ‘फ्राईड बियर’

beer
डॅलस, टेक्सास येथील रेस्टॉरंटमध्ये जर खुसखुशीत ‘रॅव्हीयोली’ मागविली तर त्यामध्ये वास्तविक भाज्यांचे किंवा चिकन अथवा मटणाचे स्टफिंग, म्हणजेच शाकाहारी किंवा मांसाहारी सारण असणे अपेक्षित असते. पण आता या तळलेल्या रॅव्हीयोलीमध्ये सारण म्हणून चक्क बियर भरली जात आहे. हा पदार्थ लोकांसाठी अनोखा असून, तो ‘फ्राईड बियर’ या नावाने लोकप्रिय झाला आहे.
beer1
या ‘फ्राईड बियर’ ची कल्पना मार्क झेबेल याची असून, २०१० साली आयोजत केल्या गेलेल्या ‘टेक्सास स्टेट फेअर’ या प्रदर्शनामध्ये मार्कने हा पदार्थ पहिल्यांदा सादर केला होता. या प्रदर्शनामध्ये मार्कला फ्राईड बियरची सर्वात अभिनव कल्पना सादर केल्यामुळे गौरविण्यात आले होते. एखाद्या पदार्थाच्या पीठामध्ये बियर घालून तो पदार्थ बनविणे फारसे कठीण नसले, तरी एखाद्या पदार्थामध्ये बियर भरून तो पदार्थ तळून बनविण्याचे काम मात्र मोठ्या जिकीरीचे आहे.
beer2
फ्राईड बियरची कल्पना सुचाल्यानंतर त्या कल्पनेची अंमलबजावणी करीत तो पदार्थ अगदी ‘परफेक्ट’ करण्यासाठी मार्कला तब्बल तीन वर्षांचा कालावधी लागला. प्रत्येक रॅव्हीयोलीमध्ये बियर भरून ती वीस सेकंद नेमकी तळून काढणे हे काम अतिशय कौशल्याचे आहे. याच कारणासाठी मार्क झेबेलची ही फ्राईड बियर झपाट्याने लोकप्रिय होत आहे.

Leave a Comment