अत्याधुनिक अलकनंदा क्रुझ मधून करा गंगेची सफर

alaknanda
देशातील पवित्र शहराच्या यादीत नंबर एक वर असलेल्या वाराणसी म्हणजे काशी येथे आता गंगा घाट, गंगा आरती पाहण्यासाठी अत्याधुनिक क्रुझ सेवा सुरु झाली असून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी २ सप्टेंबरला अलकनंदा या क्रुझचे अनावरण केले. दरवर्षी काशीला लाखो भाविक देश विदेशातून येत असतात. गंगेवरील सर्व ४८ घाट या क्रुझ मधून पाहता येणार आहेत. यामुळे पर्यटनाला प्रोत्साहन मिळणार आहे. या क्रुझ मधून रात्री प्रसिद्ध गंगा आरतीचा अनुभव घेता येणार आहे.

३० मीटर लांबीची हि क्रुझ दोन मजली असून त्यात एकावेळी १२५ प्रवासी प्रवास करू शकणार आहेत. हि करून वातानुकुलीत आहे आणि इकोफ्रेंडली आहे. या क्रुझ प्रवासासाठी प्रत्येकी ७५० रु. भाडे आकारले जाणार आहे. त्यात खाणेपिणे, जीपीएस, वायफाय अश्या सुविधा आहेत. क्रुझ मध्ये ४ बायो टॉयलेटची सुविधा दिली गेली आहे. क्रुझ ला काचेच्या मोठ्या खिडक्या आहेत यामुळे प्रवासी बाहेरचे दृश्य स्पष्ट पाहू शकणार आहेत.

Leave a Comment