भारताबाहेर टीव्हीचे उत्पादन करणार सॅमसंग

samsung
चेन्नई : एका बड्या कंपनीने भारतातून टीव्हीचे उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला असून टीव्ही उत्पादन भारताबाहेर नेण्याची योजना दिग्गज इलेक्ट्रॉनिक्स कंपनी सॅमसंगने बनवली आहे. सॅमसंगच्या चेन्नई यूनिटमधून सध्या भारतात टीव्ही बनतात. पण आता व्हिएतनाममधून भारतात टीव्ही कंपनी आयात करेल. यासंदर्भात टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार स्थानिक सप्लायरना कंपनीने याबाबत कल्पना दिलेली आहे. चेन्नईमधील यूनिटमधून सॅमसंगच्या ३ लाख टीव्हींचे उत्पादन होते.

या वृत्तानुसार बजेटमध्ये टीव्ही पॅनल बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पार्ट्सवर आयात शुल्क वाढवण्यात आल्यामुळे कंपनी नाराज झाल्याचे बोलले जाते. टीव्ही पॅनल बजेटमध्ये बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ओपन सेलवर १० टक्के आयात शुल्क वाढवण्यात आले होते. पण अनेक कंपन्यांनी विरोध केल्यानंतर हे शुल्क घटवून अर्ध्यावर करण्यात आले. २०१६-१७ या वर्षामध्ये सॅमसंगला भारतात ८ अरब डॉलरचे महसुली उत्पन्न मिळाले होते.

नोएडामध्ये मोबाईल फोन बनवण्याची क्षमता कोरियाच्या या कंपनीने ६७ लाखांवरून १.२ कोटी युनिट केली आहे. ही जगातील सगळ्यात मोठी मोबाईल फोन बनवणारी कंपनी असल्याचे सॅमसंगचे सीईओ एचसी हॉन्ग यांनी सांगितले होते. भारतात भारतीयांसाठीच नाही तर जगासाठी आम्ही मोबाईल बनवत आहोत. भारत सरकारच्या नितींसोबत आम्ही आहोत आणि भारताला मोबाईल फोन निर्यातीचे हब बनवण्याचे स्वप्न असल्याचे कंपनीने सांगितले होते.

Leave a Comment