२१५ वर्षे जुन्या कोसळलेल्या झाडाच्या मुळांमध्ये सापडली हाडे

tree
आयर्लंड – काही दिवसांपूर्वी नॉर्थ आयर्लंडमध्ये आलेल्या एका वादळानंतर एक विचित्र घटना घडली असून २१५ वर्ष जुने एक झाड येथे वादळामध्ये उन्मळून पडल्यानंतर या झाडाची मुळे वरती आली. पण त्या झाडांच्या मुळांमध्ये अडकलेली हाडे लोकांना दिसल्यानंतर तेथील लोकांनी पोलिसांना फोन केला.
tree1
पोलीस डार्क हॅजेस नामक या प्रसिद्ध ठिकाणी आल्यानंतर त्यांना या झाडाच्या मुळाशी अर्धा हाडांचा सांगाडा आढळून आला. झाडाच्या मुळांमध्ये सांगाड्याचा काही भाग अडकलेला होता. नेमके हे काय आहे, याविषयी पोलिसांनाही समजत नव्हते. पोलिसांनी त्यानंतर काही वैज्ञानिकांना घटनास्थळी बोलावले.
tree2
झाडांच्या मुळाशी निघालेला हाडांचा सांगाडा पाहून वैज्ञानिकही चकित झाले होते. हे झाड २१५ वर्ष जुने असल्याचे तपासामध्ये आढळून आले. ज्या वादळामुळे हे भीमकाय झाड पडले त्या वादळाचा वेग १६० किमी/तास होता. वैज्ञानिकांसमोर सर्वात मोठा प्रश्न हा होता की, हा सांगाडा कुणाचा आहे आणि या झाडाखाली तो कसा? वैज्ञानिकांनी अधिक शोध घेऊन याचा अभ्यास केल्यानंतर समोर चकित करणारे काही खुलासे झाले.
tree3
वैज्ञानिकांनी कार्बन डेटिंग हा सांगाडा ज्या व्यक्तीचा होता त्याचे वय मृत्यूच्या वेळी १७ ते २० वर्षांचे होते. त्यानंतर कार्बन आयसोटोपने समजले की हा पुरुष सांगाडा असून १००० वर्षांपूर्वीचा आहे. एक्स्पर्टसने सांगितले की, कार्बन आयसोटोप्सच्या माध्यमातून अशाप्रकारच्या गोष्टींचे निश्चित वय समजू शकते कारण कार्बन आयसोटोप्स एका निश्चित गतीने कमी होत जातात. जवळपास सहा फूट या सांगड्याची उंची होती. पण त्या काळातील सामान्य उंचीनुसार ही उंची कमी होती.
tree4
ज्या गोष्टी सुरुवातीला समोर आल्या त्यापेक्षा जास्त चकित करणाऱ्या गोष्टी हाडांचा अभ्यास केल्यानंतर समोर आल्या. या व्यक्तीचे शरीर कापण्यात आले असून मधोमध त्याचे शरीर कापल्यानंतर त्याचे हात कापण्यात आले होते. यावरून व्यक्तीचा मृत्यू नैसर्गिक झाला नसल्याचे लक्षात आले. यामध्ये दोन शक्यता असू शकतात. पहिली म्हणजे या व्यक्तीचा मृत्यू भांडणात किंवा त्याला क्रूर शिक्षा देण्यात आली असावी किंवा युरोपमध्ये त्यावेळी झालेल्या एखाद्या युद्धामध्ये या व्यक्तीचा मृत्यू झाला असावा.

Leave a Comment