उकळत्या दुधामध्ये तुळशीची पाने घालून त्याचे सेवन करणे लाभदायक

milk
तुळशीची पाने आणि तुळशीचे बी औषधी असल्याने अनेक आजारांवरील घरगुती उपायांमध्ये यांचा वापर लाभकारी ठरतो. गेल्या अनेक पिढ्यांपासून चालत आलेले हे घरगुती उपाय आरोग्याच्या दृष्टीने फायद्याचे आहेतच, शिवाय त्यांचे कोणते दुष्परिणाम देखील नाहीत. तुळशीची पाने औषधी असून, अनेक विकारांवर गुणकारी आहेत. सर्दी पडसे असो, किंवा डोकेदुखी असो, तुळशीच्या पानांचा काढा या सर्वच किरकोळ व्याधींवर गुणकारी आहे. तुळशीची पाने दुधामध्ये उकळून या दुधाचे सेवन केल्याने देखील अनेक व्याधींमध्ये गुण येतो. तुळशीची चार पाच पाने दुध उकळत असताना त्यामध्ये टाकावीत आणि दुध थोडेसे थंड झाल्यावर त्याचे सेवन करावे. या दुधाचे सेवन सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी करावे.
milk1
जर किडनी स्टोन्स झाल्याचे निदान, योग्य वेळी, व्याधी बळावण्यापूर्वीच झाले तर तुळस घातलेल्या दुधाचे सेवन रिकाम्या पोटी केल्याने गुण येतो. या दुधाने किडनी स्टोन विरघळण्यास मदत होते. ज्यांना हृदयरोग आहे, किंवा एखादा हृदयविकाराचा झटका येऊन गेला आहे, त्यांच्यासाठी देखील तुळस घातलेल्या दुधाचे सेवन लाभकारी आहे. हृदयरोगासाठी या दुधाचे सेवन फायदा करणारे आहे.
milk2
ज्यांना दम्याचा विकार असेल, किंवा ऋतुमान बदलल्याने, किंवा एखाद्या अॅलर्जीमुळे श्वसनाशी संबंधित तक्रारी उद्भविल्या असतील, त्यांचासाठी देखील तुळस घालून उकळलेल्या दुधाचे सेवन विशेष लाभकारी आहे. त्यामुळे ऋतुमान बदलत असताना श्वसना संबंधी समस्या उद्भविण्याची वाट न पाहता या दुधाचे सेवन नियमित करावे. तुळस अँटी बायोटिक असल्याने अनेक तऱ्हेच्या संसर्गांपासून शरीराचा बचाव करण्यास सक्षम असते.
milk3
अनेकदा हवामान बदलत असताना व्हायरल फ्लूची साथ येते. सर्दी, खोकला, ताप यांचा संसर्ग वाढतो. अश्या वेळी तुळस घातलेल्या दुधाचे सेवन या व्याधींना प्रतिरोध करून शरीर निरोगी ठेवण्यास सहायक आहे. तसेच ज्यांना डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास असेल, त्यांच्यासाठी देखील हे दुध विशेष लाभकारी आहे. अश्या व्यक्तींनी सकाळी चहा, कॉफी घेण्यापूर्वी तुळस घालून उकळलेल्या दुधाचे सेवन करावे. त्यामुळे मायग्रेनसारख्या समस्यांमध्ये विशेष लाभ मिळतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment