उद्यापासून फ्लिपकार्टवर Realme २चा धमाकेदार सेल

realme
मुंबई : भारतीय बाजारपेठेत ओप्पोची पॅरेंट्स कंपनी असलेल्या Realme चा Realme२ स्मार्टफोन लॉन्च झाला असून याची किंमत खूप स्पेशल असल्याने मोबाईलची चांगलीच चर्चा आहे. Realme ने काही महिन्यांपूर्वी ओप्पोचे सर्व ब्रॅण्ड मार्केटमध्ये आणले होते. त्यानंतर Realme ही वेगळी कंपनी बनवली आहे. Realme २ नवा स्मार्टफोन Realme १ चे अपग्रेड वर्जन आहे. ४ सप्टेंबरला १२ वाजल्यापासून या स्मार्टफोनची विक्री फ्लिपकार्टवर सुरू होणार आहे.

हा फोन एचडीएफसी बॅंक डेबिट/क्रेडिट कार्ड यूजर्सना ७५० रुपयांच्या डिस्काऊंटवर मिळणार आहे. म्हणजेच त्यांना हा फोन ८ हजार २४० रुपयांमध्ये मिळणार आहे. एक्स्चेंज ऑफरनुसार फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकाला पाचशे रुपयांचा अतिरिक्त लाभ मिळणार आहे. रिलायन्स जियो ग्राहक १२० जीबी आणि ४ जी डाटा व्यतिरिक्त ४२०० रुपयांचा कॅशबॅकचा लाभही मिळणार आहे.

Realme २मध्ये फेस अनलॉक, ४२३० एमएच बॅटरी, ड्युअल ४ जी बी ओएलटीई आणि ४ जीबी रॅम आहे. या फोनमध्ये बॅक फिंगरप्रिंट सेंसर आहे. किंमतीच्या बाबतीत या फोनची स्पर्धा शाओमी रेडमी ५ आणि नोकीया ३.१ अशा हॅंडसेटसोबत होईल.

Leave a Comment