मायकल जॅक्सनची कन्या पॅरिस मायकल कॅथरीन विषयी काही तथ्ये

michael-jackson
पॉप संगीत आणि नृत्याच्या कौशल्याचा बादशाह मायकल जॅक्सन आज हयात नसला, तरी त्याच्या संगीताची जादू आजही कायम आहे. मायकलचा जन्म इंडियाना मध्ये झाला आणि वयाच्या ५१ वर्षी त्याचे अचानक निधन झाले होते. आपल्या संगीताच्या आणि नृत्यकौशल्याच्या जोरावर आपल्या चाहत्यांच्या हृदयांवर अनेक दशके राज्य करणाऱ्या मायकलची कन्या पॅरिस मायकल कॅथरीन जॅक्सन ही तिच्या अप्रतिम सौंदर्याकरिता ओळखली जाते.
michael-jackson1
पॅरिस ही मायकल आणि त्याच्या दुसऱ्या पत्नीची मुलगी आहे. मायकलने आपल्या आयुष्यामध्ये दोन विवाह केले. त्याचा पहिला विवाह १९९४ साली लिसा मेरी प्रेसली हिच्याशी झाला. त्याचा हा विवाह दोन वर्षे टिकला. त्यानंतर १९९६ साली मायकलने दुसरा विवाह डेबी रो हिच्याशी केला. याच विवाहसंबंधांतून पॅरिस मायकल कॅथरीन हिचा जन्म झाला.
michael-jackson2
पॅरिस ही व्यवसायाने गायिका आणि अभिनेत्री आहे. अनेक समाजिक संस्थांच्या मार्फत ती सामाजिक कार्यामध्येही पुढाकार घेत असते. वयाच्या चौदाव्या वर्षी शारीरिक शोषणाला बळी पडलेली पॅरिस त्यानंतरच्या काही काळामध्ये अतिशय निराश मनस्थितीमध्ये होती. याच नैराश्याच्या पायी पॅरिसने तीन वेळा आत्महत्येचा प्रयत्नही केला होता, आपण सुदैवाने तीनही वेळा ती बचावली. या आत्मघातकी प्रयत्नांच्या नंतर अखेरीस तिला युटाह येथील मनोरुग्णकेंद्रामध्ये भरती करविण्यात आले होते.
michael-jackson3
या थेरप्युटिक स्कूलमध्ये राहून पॅरिसची मनस्थिती पुष्कळच सुधारली आणि तिने आपल्या पुढील शिक्षणाकडे लक्ष केंद्रित केले. नैराश्याने भरलेल्या मनस्थितीमधून ती हळू हळू बाहेर येऊ लागली. आता पॅरिस एक प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका आहे. सामाजिक कार्यामध्येही पॅरिसचा मोठा सहभाग असतो.

Leave a Comment