महिंद्राची नेक्स्ट जेन मॅराझो बाजारात दाखल

mahindra
मुंबई – नेक्स्ट जेन मॅराझो ही चारचाकी आनंद महिंद्रा यांनी सोमवारी लाँच केली असून १४१.१३ किलोग्रॅमचे या गाडीचे इंजिन असून या गाडीची शोरूम किंमत ९.९९ लाख एवढी असून ती ऑन रोड १३.९० लाखांपर्यंत जाते. महिंद्रा मॅराझो ही मल्टीपर्पज गाडी असून डॅशबोर्ड, इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, सीटिंग लेआऊट, हेडलॅम्पस्, फ्रंट ग्रिल, टेल लॅम्पस् या यात सुविधा मिळतात.

या गाडीत एमपीव्हीला कॉन्ट्रास्टिव्ह सिल्व्हर कलरसह ब्लॅक बेज थीमसह दुहेरी टोन डॅशबोर्ड मिळेल. सेंट्रल कन्सोलची रचना पारंपरिक आहे. याला एसी व्हेंटखाली टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. याचे स्टिअरिंग व्हील केयूव्ही १०० आणि टीयूव्ही ३०० प्रमाणेच आहे. खालील भागाला चमकदार काळ्या रंगाचे फिनिशिंग आहे. याला मल्टी कलर इन्फो डिस्प्लेसह सिंपल ट्विन-डायल सेटअप आहे. गाडी चमकदार निळ्या-जांभळ्या ब्लॅकलिटमध्ये येते. एमपीव्हीलाही बेज लेदरीट अपहोल्स्ट्री असून एकापेक्षा जास्तीत जास्त व्हेंट्सवर चालणारे रनिंग रूफ-माऊंटेड एसी असणार आहेत. या आलिशान गाडीत ८ लोक आरामात बसू शकतात.

Leave a Comment