मुंबई : लवकरच नवा आयफोन अॅपल लाँच करणार असून १२ सप्टेंबर रोजी कॅलिफोर्नियातील क्यूपरटीनोमधील अॅपल पार्कच्या स्टीव्ह जॉब्स थिएटरमध्ये अॅपलचे नवे आयफोन लाँच होतील. या इव्हेंटमध्ये फोनशिवाय आणखी काही गॅजेटही लाँच केले जाणार असून त्यात अॅपल वॉच ४, अॅपल एअर पॉवर आणि पॉड २ यांचा समावेश आहे. कंपनीचे सीईओ टीम कुक यांच्या हस्ते लाँचिंग होण्याची शक्यता आहे.
अॅपलच्या सर्वात मोठ्या इव्हेंटमध्ये लाँच होणार आयफोनसह अनेक गॅजेट
यावेळी अॅपल तीन आयफोन लाँच करणार आहे. ६.५ इंच, ५.८ इंच आणि ६.१ इंच या आकाराची स्क्रीन असणाऱ्या या आयफोन्सचे फीचर्सही दमदार असतील. शिवाय ६.५ इंच आकाराची स्क्रीन असणाऱ्या आयफोनची किंमत अमेरिकेत एक हजार डॉलर म्हणजेच भारतात जवळपास ९० हजार रुपये असेल, असेही वृत्त आहे.
१२ सप्टेंबरला अॅपल स्मार्टवॉच ४ लाँच होण्याची शक्यता आहे. दमदार बॅटरी बॅकअप आणि चांगल्या परफॉर्मन्ससह ही स्मार्टवॉच दोन साईजमध्ये असेल. एक ३८ एमएम आणि दुसरी ४२ एमएम अशी साईज असण्याचा अंदाज आहे. यामध्ये चार चिपसेट असतील. कनेक्टिव्हिटीसाठी एलटीई आणि वायफाय सुविधा दिली जाण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी या डिव्हाईसचा लूक लाँच करण्यात आला होता. त्यामुळे यावेळी हे नवे डिव्हाईस लाँच केले जाण्याची अपेक्षा आहे. अॅपल पॉड २ चे वायरलेस इयरफोन लाँच होण्याची शक्यता आहे. हे डिव्हाईस वॉटर रेजिस्टेंट असेल.