न्यूझीलंडमधील या गावामध्ये लावला जाणार मांजरींवर ‘बॅन’!

cat
न्यूझीलंड मध्ये एक गाव असे आहे, जिथे मांजरी पाळण्यावर बंदी घालण्याचा विचार स्थानिक प्रशासनातर्फे करण्यात येणार आहे. या गावातील लोकांना मांजरींच्या विषयी मनामध्ये प्रेम नाही असे नाही, पण तरीही या गावामधील रहिवाश्यांना आता मांजर पाळण्याची परवानगी नाकारण्याच्या तयारीमध्ये प्रशासन असल्याचे समजते. ही बाब काहीशी गोंधळात टाकणारी आहे खरी, पण त्यामागे ही एक कारण असल्याचे समजते.
cat1
प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तांच्या नुसार न्यूझीलंड येथील ‘omaui’ नामक गावामध्ये मांजरी पाळण्यावर बंदी घालण्यात येणार आहे. ज्या रहिवाशांकडे आधीपासूनच मांजरी पाळलेल्या आहेत, त्यांना त्यांच्या मांजरी मृत्यू पावल्यानंतर दुसरी मांजर पाळता येणार नाही. या नवीन योजनेमागे कारण हे, की या गावामध्ये मांजरी पक्षी खात असून, त्यामुळे पक्ष्यांच्या संख्येमध्ये लक्षणीय घट झाल्याचे दिसून आले आहे. अनेक पक्ष्यांच्या प्रजाती तर नाहीश्या होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे या प्रश्नावर उपाय म्हणून रहिवाश्यांनी मांजरी पाळू नयेत असा नियम लवकरच अस्तित्वात येणार असल्याचे समजते.
cat2
बायो डायव्हर्सिटी तज्ञांच्या मते पक्ष्यांची संख्या खूपच रोडावली असून, हा प्रश्न दिवसेंदिवस जास्तच गंभीर होत चालला आहे. त्यामुळे याकडे वेळीच लक्ष दिले नाही, तर पक्ष्यांच्या अनेक प्रजाती संपूर्णपणे नाहीश्या होतील असे तज्ञांचे म्हणणे आहे. पक्ष्यांच्या प्रजाती नष्ट होण्याचा थेट प्रभाव इकोसिस्टमवर पडत असल्याचे तज्ञांचे म्हणणे असून, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियातील काही ठिकाणी देखील पक्ष्यांच्या संख्येमध्ये लक्षणीय घट दिसून येत आहे.

Leave a Comment