नासाने केला गुरू ग्रहावरील ग्रेट रेड परिसरात पाणी असल्याचा दावा

nasa
वॉशिंग्टन – नासाच्या शास्त्रज्ञांकडून गुरू ग्रहावरील ग्रेट रेड भागात पाणी असल्याचा दावा करण्यात आला असून पाणीयुक्त ढग ग्रेट रेड भागात दिसून आल्याचेही सांगण्यात येत आहे.

पाणी ऑक्सिजनपासून तयार होते. ऑक्सिजनचे प्रमाण गूरु ग्रहावर सूर्यापेक्षा ९ पट जास्त आहे. गुरूच्या उपग्रहांवरील बराच भाग बर्फाने आच्छादलेला असल्यामुळे ग्रहावर पाणी असण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. गुरू हा पृथ्वीनंतरचा पहिला बाष्प रूपात पाणी सापडलेला ग्रह आहे. शिवाय ग्रहाची गुरुत्वाकर्षण शक्ती पृथ्वीसारखीच आहे.

Leave a Comment