जागतिक बाजारपेठ काबिज करू शकतात ८५ टक्के अँड्रॉईड स्मार्टफोन

smartphone
नवी दिल्ली – अँड्रॉईड स्मार्टफोन यावर्षाच्या अखेरपर्यंत ८५ टक्के जागतिक बाजारपेठ काबिज करू शकतात, असे एका अहवालात म्हटले आहे. ही संख्या २०२२ पर्यंत १.४१ अब्जापर्यंत जाण्याची शक्यता आयडीसीच्या अहवालात वर्तवण्यात आली आहे. पण या शर्यतीत अॅपल मागे पडताना दिसत आहे.

मागील काही काळापासून अँड्रॉईड फोनच्या सरासरी विक्री किमतीमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. २०१७ च्या तुलने स्मार्टफोनच्या सरासरी विक्री किमतीमध्ये २०१८ साली तब्बल ११.४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. स्मार्टफोनच्या संख्येत मागील काही काळापासून झाली आहे. पण या संख्येत येत्या काळात घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. स्मार्टफोनच्या संख्येत २०१८ मध्ये ०.७ टक्क्यांनी घट झाली आहे. ब-याच काळापासून अॅपलच्या विक्रीमध्ये वाढ झालेली नाही. २०२२ पर्यंत अॅपलचे २३ कोटी ८५ लाख वापरकर्ते असतील असा अंदाज या अहवालात मांडण्यात आला आहे.

Leave a Comment