नवी दिल्ली – पेटीएममध्ये अमेरिकन अब्जपती गुंतवणूकदार वॉरेन बफेट यांची कंपनी बर्कशायर हॅथवे कंपनीने मोठी भागीदारी खरेदी केली असून या बातमीला पेटीएमचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय शेखर शर्मा यांनी ट्विट करुन दुजोरा दिला आहे.
अब्जपती वॉरेन बफेटच्या हॅथवची पेटीएममध्ये गुंतवणूक
बर्कशायर कंपनीचे टॉड कॉब्ज यांचा पेटीएमच्या संचालक मंडळात समावेश असणार आहे. कॉब्स म्हणाले, की पेटीएममुळे मी प्रभावित आहे. पेमेंट आणि वित्तीय सेवेत बदल करण्याचे काम ही सेवा करत आहे. विजय शेखर शर्मा यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले, की वित्तसेवा क्षेत्रात बर्कशायर कंपनीला दीर्घ अनुभव असून त्यांची पेटीएममधील गुंतवणूक ही ५० कोटी भारतीयांना अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात आणेल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला. दरम्यान, दोन्ही कंपन्यांनी किती गुंतवणूक करण्यात आली, याबाबतची अधिकृत माहिती जाहीर केली नाही.