उत्पन्नाच्या निकषात पहिल्या स्थानावर एअरटेल तर दुसऱ्या स्थानी जिओ

airtel
नवी दिल्ली – महसुली उत्पन्नाच्या निकषात एअरटेलने जिओ आणि व्होडाफोनला पछाडत पहिल्या स्थानावर विराजमान विराजमान झाली आहे. तर कमाईच्या बाबतीत ‘रिलायन्स जिओ इन्फोकॉम’ देशातील दुसरी मोठी टेलिकॉम कंपनी बनली आहे.

जून २०१८ च्या तिमाहीत रिलायन्स जिओ कंपनीचा ४ जी सेवेच्या मदतीने रेव्हेन्यू मार्केट शेअर (बाजारहिस्सा) २२. ४ टक्क्यांवर पोहोचला. कंपनीच्या रेव्हेन्यू मार्केट शेअरमध्ये २.५३ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आल्याची माहिती ‘टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडिया’ने (ट्राय) दिली आहे. दुसऱ्या स्थानावर व्होडाफोन आहे. व्होडाफोनचा आरएमएस मार्च तिमाहीच्या तुलनेत १.७५ टक्क्याने घसरून १९.३ टक्क्यांवर आला आहे. या व्यतिरिक्त आयडिया सेल्युलरचे आरएमएस १.०६ टक्क्याने खाली आले असून १५.४ आहे. दुसरीकडे एअरटेलचे रेव्हेन्यू मार्केट शेअर जून तिमाहीत ०.१२ ने घसरले असून ३१.७ टक्के आहे. लवकरच जिओ एअरटेलला मागे टाकत टॉपवर येईल, अशी शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे.

Leave a Comment