टोयोटा करणार उबेरमध्ये स्वंयचलित कारच्या निर्मितीकरिता गुंतवणूक

toyota
सॅन फ्रान्सिस्को- स्वंयचलित कारचा उद्योग जगभरात विस्तारत असताना यात जपानच्या टोयोटा कंपनीने देखील उडी घेतली आहे. टोयोटाने या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या उबेर कंपनीत ५० कोटींची गुंतवणूक केली आहे.

जगभरातील आघाडीची कार निर्मिती करणारी टोयोटा ही जपानची कंपनी आहे. ही कंपनी उबेरमध्ये गुंतवणूक करुन स्वंयचलित कारच्या निर्मितीत भागीदारी करणार आहे. कंपनीसाठी हा करार आणि गुंतवणूक मैलाचा दगड ठरणार असल्याचे टोयोटाचे अध्यक्ष शीगेकी टोमोयामा यांनी सांगितले.

उबेरने एका पादचाऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर स्वयंचलित कारच्या सर्व चाचण्या रद्द केल्या होत्या. अमेरिकेतील अॅरिझोनामध्ये ही घटना घडली होती. उबेर हे ट्रॅव्हल अॅप असून २०१६ पासून ती स्वंयचलित कार चालविण्याचे तंत्रज्ञान विकसित करत आहेत.

Leave a Comment