एअरटेल आणि जिओच्या प्लानला टक्कर देणार व्होडाफोनचा ‘हा’ प्लान

vodafone
मुंबई : अद्यापही इतर कंपन्यांसाठी रिलायन्स जिओने बाजारात दाखल घातलेला धुमाकूळ भारी पडत आहे. व्होडाफोनने यातूनच सावरण्यासाठी आता पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांसाठी एक नवी ऑफर सादर केली आहे. १५९ रुपयांचा नवा प्रिपेड रिचार्ज पॅक व्होडाफोनने ग्राहकांसाठी लॉन्च केलाय. ग्राहकांना या पॅकमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसोबत २८ जीबी डाटा मिळणार आहे. २८ दिवसांसाठी हा पॅक वैध राहील. म्हणजेच ग्राहकांना १ जीबी हाय स्पीड डाटा प्रतिदिन मिळेल. भारताच्या सर्व सर्कल्समध्ये हा प्लान लागू असेल.

Leave a Comment