या ६ कंपन्‍यांच्या मालकिणीने दोन वेळच्या जेवणासाठी दररोज ८ जणांसोबत शेअर केला बेड

dani-johnson
अमेरिकेतील एका महिलेवर दोन वेळचे पोट भरण्यासाठी तिच्‍यावर वेश्‍या व्‍यवसाय करणाऱ्याची वेळ आली होती आणि ती आज एक-दोन नव्हे तर तब्बल ६ कंपन्‍यांची मालकीन आहे. त्याचबरोबर तिने आपल्या या प्रवासाबाबत लिहिलेले पुस्‍तकही खूप लोकप्रिय झाले आहे. पुस्तकाच्या विक्रीने विक्रमही केला आहे. डेनी जॉनसन असे या महिलेचे नाव आहे.
dani-johnson1
रिलेशनशिप मार्केटिंगमधील डेनी जॉनसन हे एक प्रसिद्ध नाव आहे. त्याचबरोबर ती एक लेखक, उत्तम वक्‍ता आणि अर्थ सल्‍लागार आहे. ती आपल्‍या कंपनीच्‍या माध्‍यमातून लोकांना कॉरपोरेट ट्रेनिंग देते. डेनीवर फोर्ब्‍स मासिकानेही कव्हर स्‍टोरी केली होती.
dani-johnson2
आपल्‍या एका कल्‍पनेच्‍या भरोवशावर डेनीने केवळ एका वर्षांत २.५ लाख डॉलरची म्हणजेच १.६ कोटी रुपयांची कमाई केली. त्‍यानंतर दुसऱ्याच वर्षी जवळपास १० लाख डॉलर म्हणजेच ६.७ कोटी रुपये कमावले आणि ती आज सहा कंपन्‍यांची मालकीन आहे. तसेच डेनी आणि तिच्‍या पतीने आपली ९० टक्‍के संपत्‍ती दान करण्‍याचा निर्णय घेतला आहे. तिला एके काळी दोन वेळच्‍या जेवणासाठी ८ वेगवेगळ्या लोकांसोबत शारीरिक संबंध ठेवावे लागले होते.
dani-johnson3
तिचे बालपण आणि तारुण्‍य खूप खडतर होते. तिचे आई-वडील आणि ती स्‍वत: ड्रग अॅडिक्‍ट होती. तिचे लहान वयातच लग्‍न झाले. त्यात डेनीकडे होते नव्‍हते ते सर्व लुटून नवऱ्याने पळ काढला. तिच्‍याकडे त्‍यानंतर ना घर होते ना दार. खिशात होते केवळ २.३ डॉलर आणि वडिलांची एक कार. याच कारला तिने आपले घर केले होते. फोर्ब्‍सच्‍या मुलाखतीत डेनीने सांगितले, माझी परीक्षा पाहाणाराच तो काळ होता. मी त्‍या दोन महिन्‍यांत नशेतच होती. या काळात ८ वेगवेगळ्या पुरुषांसोबत मी शरीर संबंधही ठेवले. ते यासाठीच की आपल्‍या दोन वेळच्‍या जेवणाची सोय व्हावी.

Leave a Comment